Vijaykumar Dudhale
विजयसिंह मोहिते पाटील यांचा जन्म 12 जून 1944 मध्ये झाला. त्यांनी आपल्या राजकीय इनिंगचा श्रीगणेशा ग्रामपंचायत सदस्यपदापासून केला. ते 1970 च्या दशकात अकलूजचे सरपंच झाले.
सरपंच म्हणून चांगले काम केल्यानंतर ते सोलापूर जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले. ते 1971 ते 1979 या कालावधीत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. दुष्काळातही त्यांनी उत्कृष्ट काम करून दाखवले होते.
सोलापूर जिल्हा परिषद गाजवल्यानंतर विजयदादांनी 1980 मध्ये माळशिरसमधून विधानसभा लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत ते आमदार झाले. ते 1980 पासून 2004 पर्यंत सलग 24 वर्षे ते माळशिरसचे आमदार होते.
शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात विजयसिंह मोहिते पाटील हे पहिल्यांदा मंत्री झाले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन, तसेच ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी 25 वर्षे काम पाहिले.
विजयसिंह मोहिते पाटील हे 25 डिसेंबर 2003 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. त्यांचा 1972 मधील दुष्काळात झालेला विवाह सोहळा लक्ष भोजनामुळे देशभरात गाजला होता.
माळशिरस मतदारसंघ पुनर्रचनेत राखीव झाला, त्यामुळे त्यांनी 2009 च्या निवडणुकीत पंढरपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून मोहिते पाटील यांच्या राजकीय दबदब्याला उतरती कळा लागली.
पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे आरक्षण हटून तो फलटणसह पूर्वीच्या पंढरपूरमधील विधानसभा मतदारसंघाचा माढा लोकसभा मतदारसंघ तयार झाला. त्या मतदारसंघातून विजयदादांनी मोदी लाटेतही राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक जिंकली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेल्या कोंडीमुळे त्यांनी 2019 च्या निवडणुकीअगोदर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
देशाचे सर्वात तरुण पोलिस महानिरीक्षक अरुण मोहन जोशी