Roshan More
मणिपूरमधून सुरू झालेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
राहुल गांधींची न्याय यात्रा मार्चमध्ये महाराष्ट्रात येईल. त्यासाठी काँग्रेसकडून तयारी सुरू आहे.
राहुल गांधीच्या यात्रेसाठी महाराष्ट्रात काँग्रेसने वॉररूम तयार केली आहे. राहुल गांधी प्रवास करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक वॉररूम असेल. नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांची वॉररूमच्या अध्यक्षपदी निवड केली.
नाशिकमध्ये राहुल गांधी यांच्या यात्रेचे भव्य स्वागत करण्याची तयारी काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सुरू आहे.
राहुल गांधींना भेटण्याची इच्छा अनेकांची आहे. मात्र, राहुल गांधींना यात्रे दरम्यान त्यांना कोण भेटणार याचे नियोजन वॉररूममध्ये केले जात आहे.
महाराष्ट्रात राहुल गांधींची यात्रा मालेगाव, चांदवड, पिंपळगाव मार्गे नाशिक शहर आणि पुढे घोटी इगतपुरी मार्गे मुंबईला जाईल.
राहुल गांधी यांनी आसामामध्ये मंदिरात दर्शन घेतले. त्यामुळे नाशिकमध्ये देखील ते मंदिरात दर्शन घेण्याची शक्यता आहे.