Akshay Sabale
काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी हे 54 वर्षांचे झाले आहेत. 19 जून 1970 मध्ये राहुल गांधींचा जन्म दिल्लीत झाला होता.
राहुल गांधी स्वर्गीय राजीव गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पुत्र आहेत. तर, फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांचे नातू आहेत.
राहुल गांधी यांचं दिल्लीतील सेंट कोलंबा स्कूल येथे शिक्षण झालं. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षेच्या कारणास्तव राहुल आणि प्रियंका गांधींना घरी शिक्षण देण्यात येत होते.
1989 मध्ये राहुल यांनी सेंट स्टीफन कॉलेज दिल्लीत प्रवेश केला. त्यानंतर एक वर्षानंतर हॉर्वर्ड विश्वविद्यालय येथे शिक्षणासाठी गेले.
1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींना अमेरिकेतून फ्लोरिडातील रॉलिन्स कॉलेजमध्ये शिफ्ट केलं.
राहुल गांधी यांची ओळख लपविण्यासाठी त्यांचं नाव 'राऊल विंची' ठेवण्यात आलं होतं.
राहुल गांधींना त्यांच्या जीवनात दोन मोठ्या धक्क्यांना सामोर जावं लागलं आहे. ते 14 वर्षाचे असताना त्यांच्या आजी इंदिरा गांधी आणि 21 वर्षाचे असताना वडील राजीव गांधी हत्या झाली होती.