'जायंट किलर' ठरल्या या महिला आमदार; राहुल गांधींच्या पाठिंब्यानंतर घडविला इतिहास

Rajanand More

केरळ विधानसभा

केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीने सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत एक ऐतिहासिक घटनाही घडली आहे.

Kerala Assembly | Sarkarnama

फातिमा तहिलिया

फातिमा तहिलिया या काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) या पक्षाच्या देशातील पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी केरळमधील पेरांबरा मतदारसंघातून विजयी होत इतिहास घडविला आहे.

Fathima Thahiliya | Sarkarnama

जायंट किलर

३४ वर्षीय फातिमा यांनी CPI(M) पक्षाचे दिग्गज नेते टी. पी. रामकृष्णन यांना पराभूत केले. त्यामुळे त्या जायंट किलरही ठरल्या आहेत. व्यवसायाने वकील असलेल्या फातिमा कोझिकोड महानगरपालिकेत नगरसेवकही होत्या.

Fathima Thahiliya | Sarkarnama

राहुल गांधींकडून प्रचार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही फातिमा यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. तसेच त्यांच्या विजयासाठीही त्यांनी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही कामाला लावल्याचे सांगितले जाते.

Fathima Thahiliya | Sarkarnama

विद्यार्थी आंदोलन

फातिमा या विद्यार्थी असल्यापासूनच आक्रमक होत्या. हिजाबसह विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक मुद्यांवर त्यांनी महाविद्यालयात असताना आंदोलनात सहभाग घेतला आहे. सध्या त्या त्या IUML च्या मुस्लिम यूथ लीगच्या सचिव आहेत.

Fathima Thahiliya | Sarkarnama

पक्षाच्या धोरणाला विरोध

पक्षांतर्गत लैंगिक समानता आणि महिलांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दाही फातिमा यांनी उपस्थित केला होता. पक्षातील काही नेत्यांविरोधातील लैंगिक छळाच्या आरोपांवर त्यांनी थेट भूमिका घेतल्याने केरळमध्ये चर्चेत आल्या होत्या.

Fathima Thahiliya | Sarkarnama

सुधारणावादी चेहरा

IUML च्या ७५ वर्षांच्या इतिहासात क्वचितच महिलांना संधी दिली गेली. त्यातही फातिमा या एकमेव आमदार बनल्या आहेत. त्यामुळे आता त्या पक्षाच्या एकप्रकारे सुधारणावादी चेहरा बनल्या आहेत.

Fathima Thahiliya | Sarkarnama

मंत्री म्हणून संधी

केरळच्या मंत्रिमंडळातही फातिमा यांचा त्यामुळे समावेश होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्याकडूनच त्यासाठी आग्रह धरला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

Fathima Thahiliya | Sarkarnama

NEXT : आमदारही नसलेल्या ममता बॅनर्जींना मिळत राहणार 'या' सुविधा

येथे क्लिक करा.