Roshan More
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक झाले आहेत.
सलग दोन दिवस त्यांनी दिल्लीत आंदोलन केले.
राहुल गांधींनी आपल्या आंदोलनात गनिमी काव्याचा वापर केला.
त्यांनी खासदारांना भोजनाचे निमंत्रण दिले. खासदारांच्या जेवणानंतर ते त्यांना घेऊन थेट आंदोलन करण्यासाठी आकाशवाणी भवनाबाहेरील गेले. मात्र, या आंदोलनाची कल्पना नसल्याचे सरकाराची धावपळ उडाली.
आंदोलन म्हणजे घोषणाबाजी हा समज खोडून काढत त्यांनी जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेत ते आंदोलनस्थळी बसून राहिले.
राहुल गांधींच्या भूमिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची कोंडी झाली आहे. जर मोठी कारवाई झाली तर देशभर चुकीचा मेसेज जाईल, अशी भीती पोलिस प्रशासनाला आहे.
राहुल गांधी यांनी बुधवारी जंतर मंतर जवळ जात मोठे आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना आणि प्रियांका गांधींना बळाचा वापर करत ताब्यात घेतले. मात्र, ज्या प्रकारे ही कारवाई झाली त्यावर टीका होत आहे.
राहुल गांधींनी आज देखील खासदारांना भोजनाचे निमंत्रण दिले आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे आज पुन्हा दिल्लीत आंदोलन होण्याची शक्यता आहे.