Rajanand More
सोशल मीडियात सध्या ‘1980s Retro Trend’ची क्रेझ आहे. हा AI ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्येही राजकीय नेतेही मागे नाहीत. अनेक जण आपल्या फोटोंना 1980 च्या दशकातील लूक देताना दिसत आहेत.
AI च्या मदतीने नेत्यांकडून १९८० च्या दशकातील कपडे, हेअरस्टाइल, रंग, बॅकग्राउंडमध्ये बदल केला जात आहे. अनेकांनी हे फोटो सोशल मीडियात पोस्ट केले आहेत.
काही जण हे फोटो पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. बॉलीवूडमधील अभिनेते-अभिनेत्रींप्रमाणे काही नेत्यांचे फोटो व्हायरलही होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ८० च्या दशकातील एक मूळ फोटो व्हायरल होत आहे. अनेक भाजप समर्थकांनी हा फोटो पोस्ट करत एआय ट्रेंडची खिल्ली उडविली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही फोटो काँग्रेसच्या काही हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. संसदेच्या पायऱ्यांवर ८० च्या दशकातील कपड्यांतील हा फोटो व्हायरल होत आहे.
राहुल गांधींसह केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, पीयूष गोयल, खासदार विशाल पाटील, भाजपच्या आमदार आदिती सिंह, खासदार रेणुका चौधरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही आपले फोटो पोस्ट केले आहेत.
‘1980s Retro Trend’ हा एक प्रकारचा AI फोटो चॅलेंज आहे. यामध्ये सध्याचा फोटो AI टूलच्या माध्यमातून 80च्या दशकातील फॅशननुसार बदलण्यास सांगितला जातो. त्यानुसार AI वर तसा फोटो तयार होतो.
राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचे हे रेट्रो अवतारातील फोटो व्हायरल होत आहेत. त्यावर लाईक्सचा पाऊस पडत आहे. ते फोटो आवडीने शेअर केले जात आहेत.