राजकारणातील 'या' एकमेव व्यक्तीला राहुल गांधी म्हणतात 'बंधू'? व्हिडीओ होतोय व्हायरल...

Rajanand More

भारतीय राजकारण

विविध पक्षातील राजकीय नेते एकमेकांचा विशिष्ट नावाने संबोधतात. काही जण मित्र म्हणतात तर काही जण बंधू असा उल्लेख करतात. केवळ वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर भाषणांमध्येही ते असेच बोलतात.

Indian Politics | Sarkarnama

राहुल गांधी

काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातील एका व्यक्तीचा उल्लेख आपल्या भाषणांमध्ये किंवा सोशल मीडियात 'बंधू' असा करतात.

Rahul Gandhi | Sarkarnama

कोण आहे तो नेता?

इंडिया आघाडीतील अनेक तरुण नेत्यांना तुम्ही राहुल गांधी यांच्यासोबत विविध प्रचारसभा, प्रचारफेऱ्यांमध्ये पाहिले असेल. पण राहुल गांधी एका ज्येष्ठ नेत्याला बंधू म्हणतात.

Rahul Gandhi, Akhilesh Yadav | Sarkarnama

एम. के. स्टॅलिन

एम. के. स्टॅलिन हे तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. राहुल गांधी त्यांनाच बंधू म्हणतात.

M K Stalin | sarkarnama

भाषणांमध्ये उल्लेख

मागील काही निवडणुकांच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनीच एका ठिकाणी स्टॅलिन यांचा आपले ज्येष्ठ बंधू असा उल्लेख केला होता. तसेच आपण केवळ त्यांनाच ज्येष्ठ बंधू म्हणत असल्याचेही सांगितले होते.

M. K. Stalin | Sarkarnama

व्हिडीओ व्हायरल

राहुल यांचा स्टॅलिन यांना बंधू म्हणतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. प्रामुख्याने डीएमके पक्षाच्या समर्थकांकडून हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे.

Rahul Gandhi | sarkarnama

सत्तासंघर्ष

काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला आहे. डीएमकेसोबत निवडणूक लढलेल्या काँग्रेसची ही कृती म्हणजे गद्दारी असल्याची टीका डीएमकेकडून केली जात आहे.

Thalapathy-Vijay | Sarkarnama

करून दिली आठवण

डीएमकेकडून राहुल गांधी यांना त्यांच्या विधानाची आठवण करून दिली जात आहे. सोशल मीडियात अनेकांनी त्यांचा व्हिडीओ पोस्ट करत पाठीत खंजीर खुपसल्याची टीका केली आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

NEXT : लोकसभेत दोनदा पराभव अन् दोनदा आमदार; आता थेट मुख्यमंत्रिपदाची चर्चा

येथे क्लिक करा.