राहुल गांधी-स्टॅलिन यांची निवडणुकीनंतरची पहिलीच भेट; काय घडलं?

Rajanand More

राहुल गांधी चेन्नईत

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे तसेच INDIA आघाडीतील प्रमुख नेत्यांनी रविवारी (ता. २९) डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन स्टॅलिन यांची चेन्नईत भेट घेतली. भेटीला महत्व प्राप्त झाले होते.

Rahul Gandhi, MK Stalin | Sarkarnama

गळाभेट

राहुल गांधी आणि स्टॅलिन यांच्या गळाभेटीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीनंतर सहा-सात महिन्यांतर दोन्ही नेत्यांची गळाभेट झाली आहे.

Rahul Gandhi, MK Stalin | Sarkarnama

सत्तांतर

निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेसने डीएमकेसोबतची आघाडी तोडत मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला. तेव्हापासून द्रमुख आणि काँग्रेसमध्ये राजकीय दुरावा.

CM Vijay Free Laptop Scheme | Sarkarnama

भेटीला महत्व

दोन्ही नेत्यांच्या या पहिल्याच भेटीने चर्चांना उधाण आले होते. डीएमकेचे डिलिमिटेशनवर मन वळविण्यासाठी ही भेट महत्वाची मानली जात होती.

विधेयकाला विरोध

केंद्र सरकार 30 नोव्हेंबरला परिसीमनाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडणार आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी द्रमुकने INDIA आघाडीसोबत यावे, अशी भूमिका राहुल गांधी यांनी भेटीत मांडली होती.

Rahul Gandhi FIR | Sarkarnama

लोकशाहीला धोका

देशातील लोकसभा मतदारसंघांचा नकाशा आपल्या राजकीय फायद्यासाठी बदलण्याची संधी भाजपला मिळेल आणि लोकशाही धोक्यात येईल, असा दावा राहुल गांधींकडून केला जात आहे.

Rahul Gandhi | sarkarnama

द्रमुकचा पाठिंबा

राहुल गांधी यांच्या भेटीपूर्वीच द्रमुकने परिसीमनाच्या सुधारित प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. भेटीनंतरही द्रमुकने आपली भूमिका बदललेली नाही. त्यामुळे ही भेट निष्फळ ठरली.

M K Stalin | sarkarnama

मतभेद चव्हाट्यावर

परिसीमन विधेयकावर काँग्रेस आणि द्रमुक यांची भूमिका वेगळी असल्याने विरोधी आघाडीसमोर अडचण निर्माण झाली आहे. द्रमुकचे लोकसभेत 22 आणि राज्यसभेत 8 खासदार असल्याने विधेयकाच्या मतदानात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल.

NEXT : हकालपट्टी झालेल्या ग्लॅमरस महिला नेत्याची काँग्रेसमध्ये घरवापसी; विधानसभेचे तिकीट मिळणार?

येथे क्लिक करा.