Sushil Modi : बिहारमध्ये भाजपला रुजवणाऱ्या 'मोदीं’ची जीवनमरणाची लढाई

Rashmi Mane

सुशील मोदी

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.

Sushil Modi | Sarkarnama

मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ही घोषणा केली आहे.

Sushil Modi | Sarkarnama

कॅन्सरशी झुंज

त्यांचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून ते कॅन्सरशी झुंज देत आहेत.

Sushil Modi | Sarkarnama

6 महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज

सुशील मोदी हे बऱ्याच दिवसांपासून घशाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. त्यांनी एक्स माध्यमावर ट्विट करत गेल्या 6 महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत असल्याचे सांगितले आहे. 

Sushil Modi | Sarkarnama

राज्यसभेचे खासदार

सुशील मोदी सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. याआधी ते बिहार मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीही होते.

Sushil Modi | Sarkarnama

पाच दशके राजकारणात

विद्यार्थिदशेपासून ते आतापर्यंत सुशील मोदींनी तब्बल पाच दशके राजकारणात मोठी मजल मारली आहे.

Sushil Modi | Sarkarnama

पाटणा जिल्ह्यात जन्म

सुशील मोदी यांचा जन्म 5 जानेवारी 1952 रोजी पाटणा जिल्ह्यातील मारवाडी (वैश्य बनिया) कुटुंबात झाला.

Sushil Modi | Sarkarnama

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...

सुशील मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन सदस्य आहेत. हे फार कमी लोकांना माहीत आहे.

Sushil Modi | Sarkarnama

सक्रिय राजकारणात

सुशील मोदी 1990 मध्ये सक्रिय राजकारणात आले. त्यांनी बिहार विधानसभेची निवडणूक पाटणा सेंट्रल असेंब्लीमधून लढवली आणि जिंकली.

R

Sushil Modi | Sarkarnama

Next : शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; जाणून घ्या, कुणाला मिळाली उमेदवारी

Uddhav thackeray | Sarkarnama