Rajanand More
लव आणि कुश हे सीता आणि प्रभु श्रीराम यांचे पुत्र आहेत. लव आणि कुश या दोघांच्या नावावरून पाकिस्तानातील दोन शहरांना नावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांनी नुकतेच पाकिस्तानातील लाहोर येथील लव यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केले आहेत.
लव यांच्या नावावरून लाहोर शहर वसल्याचा दावा राजीव शुक्ला यांनी सोशल मीडियात केला आहे.
पाकिस्तानातील कसूर शहर हे कुश यांच्या नावावरून वसल्याचा दावाही राजीव शुक्ला यांनी केला आहे.
लाहोर आणि कसूर या शहरांबाबत महापालिकेच्या दस्तावेजामध्ये तशी नोंद आहे.
पाकिस्तानातील लव यांच्या समाधीचा जीर्णोध्दार केला जात असल्याची माहिती शुक्ला यांनी केला आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी जीर्णोध्दारासाठी पुढाकार घेतला आहे. ते मुख्यमंत्री असताना काम सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे.
पाकिस्तान सरकारलाही दोन शहरांची नावे लव आणि कुश यांच्या नावावरून पडल्याचे मान्य असल्याचा दावा शुक्ला यांनी केला आहे.