केवळ 101 दिवस खासदार, तडकाफडकी राजीनामा दिलेली 'टॉली क्वीन' कोण?

Rajanand More

कोयल मल्लिक

राज्यसभेच्या खासदार कोयल मल्लिक यांनी गुरूवारी (ता. १६) आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्या तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभेत पोहोचल्या होत्या.

Koel Mallick | Sarkarnama

टॉली क्वीन

कोयल यांचे खरे नाव रुक्मिणी असे आहे. त्या पश्चिम बंगालमधील प्रसिध्द अभिनेत्री असून कोयल या नावाचे परिचित आहेत. टॉली क्वीन म्हणून त्यांना टॉलीवूडमध्ये ओळखले जाते.

Koel Mallick | Sarkarnama

टॉलीवू़ड

टॉलीवूडमध्ये त्यांनी २००३ मध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्या ज्येष्ठ अभिनेते रंजीत मल्लिक यांच्या कन्या आहेत.

Koel Mallick | Sarkarnama

खासदार

राज्यसभेच्या सदस्यत्वाची त्यांनी ६ एप्रिल रोजीच शपथ घेतली होती. म्हणजेच त्यांनी केवळ १०१ दिवसांतच खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

Koel Mallick | Sarkarnama

काय घडलं?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. लोकसभेचे २० खासदार पक्षाला सोडून गेले आहेत. यापूर्वीच तीन राज्यसभा सदस्यांचाही राजीनामा.

TMC | Sarkarnama

चौथ्या खासदार

कोयल या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणाऱ्या चौथ्या खासदार ठरल्या आहेत. यापूर्वी तीन खासदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारीही मिळविली आहे.

Koel Mallick | Sarkarnama

भाजपमध्ये एन्ट्री?

कोयल यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने आता त्या भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्या भाजपमध्ये गेल्यास त्यांनीही उमेदवारी दिली जाऊ शकते.

Koel Mallick | Sarkarnama

अभिषेक बॅनर्जी

तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यामुळेच कोयल यांनी राजकारणात एन्ट्री केली होती. त्यांच्या आग्रहानंतर कोयल यांना राज्यसभेचे तिकीट मिळाल्याचे सांगितले जाते.

Koel Mallick | Sarkarnama

NEXT : पोलीस दलाला 10 वर्षांतच रामराम; मुख्यमंत्र्यांशी पंगा घेतल्यानंतर डॅशिंग महिला अधिकारी थेट राजकारणात

येथे क्लिक करा.