Roshan More
राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रा काढली आहे. एसआयआर विरुद्धा ते या यात्रेतून जनजागृती करत आहेत.
व्होटर अधिकारी यात्रा ही बिहारच्या 22 जिल्ह्यातून तब्बल 1600 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
या यात्रेत राहुल गांधी, तेजस्वी यादव हे बुलेट चारचाकीने प्रवास करत आहेत.
राहुल गांधींचे रॉयल एनफिल्डवरून (बुलेट) प्रवास करतानाचे फोटो व्हायरल झाले आहे. त्याच्या या बुलेटस्वारीच्या लूकची चर्चा आहे.
पांढरा टी शर्ट, ऑलिव्ह-ग्रीन पँट्स, स्पोर्ट शूजमधील बुलेट चालवताना त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या यात्रेत प्रियांका गांधी देखील सहभागी झाल्या होत्या.
राहुल गांधी हे यात्रेत बुलेट चालवत असताना प्रियांका गांधी या त्यांच्या मागे बसल्या होत्या.