Ganesh Sonawane
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात रंगली असून, याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी बेगुसराय येथे प्रचारासाठी दाखल झाले.
सभेपूर्वी त्यांनी थेट स्थानिक मच्छिमार बांधवांना भेट देण्याचा निर्णय घेतला. लोकांच्या जीवनाशी जोडून घेण्यासाठी त्यांनी भाषणाच्या आधी प्रत्यक्ष संवादाचा नवा प्रयोग केला.
पारंपरिक पांढऱ्या पोशाखात त्यांनी तळ्याकाठी पोहोचून अचानक पाण्यात उडी घेतली. स्थानिक मच्छिमारांसोबत बसून त्यांनी जाळं टाकलं आणि मासेमारीचा अनुभव घेतला.
काँग्रेस पक्षाने त्यांच्या या अनोख्या कृतीचा व्हिडिओ ‘एक्स'वर शेअर केला. काही तासांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि नेटिझन्सनी त्यांच्या या शैलीचं कौतुक केलं.
राहुल गांधींनी मच्छिमार बांधवांकडून त्यांच्या रोजीरोटीच्या अडचणी व संघर्ष ऐकून घेतले.मत्स्यव्यवसायातील सरकारी दुर्लक्ष, आर्थिक अडचणी आणि बाजारपेठेच्या समस्या यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
यावेळी व्हीआयपी पक्षाचे अध्यक्ष आणि मच्छिमार समाजाचे नेते मुकेश सहनी हेही त्यांच्यासोबत होते. दोघांनी मिळून भविष्यातील योजनांवर चर्चा केली आणि सहकार्याचं आश्वासन दिलं.
मासेमारी बंदीच्या काळात प्रत्येक कुटुंबाला ₹5,000 मदत, विमा योजना आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं आश्वासन. प्रत्येक ब्लॉकमध्ये मासे बाजार, प्रशिक्षण केंद्र आणि जलाशय पुनरुज्जीवनाचं वचनही देण्यात आलं.
बिहारचे लोक जगभर प्रगती करत आहेत, पण त्यांच्या राज्यात मागे पडले आहेत. इथलं सरकार लोकांना पुढे येऊ देत नाही, त्यांना वाटतं की बिहारचे लोक फक्त मजुरी करत राहावेत.
बेगुसरायमधील त्यांच्या सभेला प्रचंड गर्दीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बेगुसरायमधील ही सभा आणि त्यांचा मासेमारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.