Kamal Nath News : राहुल गांधी-कमलनाथ यांच्यात फोनवर चर्चा!

Sachin Fulpagare

अशोक चव्हाणानंतर कमलनाथही?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता कमलनाथही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

Ashok Chavan | Sarkarnama

विधानसभा निवडणुकीत पराभव

कमलनाथ यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशात काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवाचं खापर कमलनाथ यांच्यावर फोडण्यात आलं. यामुळे कमलनाथ नाराज होते.

Kamal Nath News | Sarkarnama

भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

कमलनाथ हे पुत्र नकुलनाथसह भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांचे निकटवर्तीय काँग्रेस नेते सज्जन सिंह यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी कमलनाथ यांच्याशी चर्चाही केली.

Kamal Nath Congress | Sarkarnama

राहुल गांधींकडून प्रयत्न!

या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे.

Rahul Gandhi News | Sarkarnama

मन वळण्याचा प्रयत्न

राहुल गांधी यांनी फोन करून कमलनाथ यांचं मन वळण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. कमलनाथ आजही काँग्रेसमध्ये आहेत आणि उद्याही राहतील, असं त्यांचे निकटवर्तीय सज्जन सिंह म्हणाले.

Kamal Nath News | Sarkarnama

सस्पेन्स कायम

कमलनाथ आणि नकुलनाथ यांच्या भाजप प्रवेशावरून सस्पेन्स कायम आहे. चर्चांदरम्यान कमलनाथ हे दिल्लीत दाखल झालेत.

Nakul Nath MP | Sarkarnama

काँग्रेसचा उल्लेख हटवला

खासदार नकुलनाथ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून काँग्रेसचा उल्लेख हटवला आहे. नकुलनाथ हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार आहेत.

Nakul Nath Congress | Sarkarnama

NEXT : मागील दहा वर्षांत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते!