Amol Sutar
सी. पी. राधाकृष्णन झारखंडचे 11 वे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले.
द्रमुकच्या प्रतिस्पर्ध्यांनीही भाजपाचे नेते, कोईम्बतूरचे दोन वेळा खासदार राहिलेले सी. पी. राधाकृष्णन यांच्या गुणांची प्रशंसा केली.
रांची राजभवनात त्यांचा वर्षभराचा कार्यकाळ अगदी कसोटीचा ठरला आहे. दक्षिण भारतात भाजपाला मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
द्रमुकचे वरिष्ठ नेते त्यांना तामिळनाडूचे अटलबिहारी वाजपेयी असे म्हणतात. स्पष्टवक्ता, स्वच्छ प्रतिमा आणि व्यावहारिक नेता म्हणून त्यांनी छाप पाडली.
16 वर्षांच्या तरुण वयात ते आरएसएसशी जोडले गेले. 1998 आणि 1999 मध्ये त्यांनी कोईम्बतूरमधून भाजपा उमेदवार म्हणून दोन लोकसभा निवडणुका जिंकल्या.
राधाकृष्णन हे भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य बनले आणि 2004 ते 2007 पर्यंत पक्षाचे तामिळनाडू अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
मोदी सरकारने नियुक्त केलेल्या इतर राज्यपालांप्रमाणे राधाकृष्णन यांचा राजभवन कार्यकाळ घटनापूर्ण होता.
झारखंडमधील आदिवासी आणि वंचित समुदायांचे जीवन सुधारणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे, असे त्यांनी अनेकदा ठामपणे सांगितले.
हेमंत सोरेन यांच्यावर केंद्रीय एजन्सींच्या वाढत्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्णन यांची भूमिका वादग्रस्त ठरली.