Rashmi Mane
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने विविध ठिकाणी जाऊन तेथील लोकांशी संवाद साधत असतात. त्यांच्या कामांविषयी माहिती घेतात आणि त्याचा आनंदही घेतात.
राहुल यांनी नुकतीच दिल्लीतील एका कॅव्हेंटर स्टोअरला भेट दिली. तिथे त्यांनी मिल्क शेक आणि कॉफी बनविण्याचा आनंद लुटला.
राहुल यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी तो शेअर केला असून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
राहुल यांनी दुकानात गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी कॉफी कशी बनवतात, हे पाहणार का, असा प्रश्न केला. त्यावर राहुल यांनी नाही, मी स्वत: बनवणार, असे उत्तर दिले आणि तयारीला लागले.
राहुल यांनी अत्यंत आत्मविश्वासाने कॉफी बनवत दुकानातील कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनाही आश्चर्यचकित केले.
राहुल यांनी यावेळी दुकानदारांकडून व्यवसायाची माहिती घेतली. छोट्या व्यावसायिकांना गुंतवणुकीच्या आणखी संधी द्यायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी कोल्ड कॉफी तर बनवलीच पण दुकानातील विविध खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला.
राहुल यांनी कॉफी बनवत असताना ग्राहकांशीही संवाद साधल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ आहे.