सरकारनामा ब्यूरो
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि सगळे निवडणूक प्रचाराला लागले. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री कोण?
दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री चौधरी ब्रम्ह प्रकाश यादव असं त्याचे नाव आहे.
दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री त्यांना दिल्लीच्या जनतेने एक खास नाव दिलं होतं. काय आहे ते खास नाव जाणून घेऊयात..?
अवघ्या 34 व्या वर्षी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा मान मिळवणारे यादव दिल्लीच्या राजकारणात सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाऊ लागले.
1952 ते 1956 पर्यंत मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला.
नंतर त्यांनी 2 वेळा लोकसभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. परंतु त्यांचं राहणीमान अत्यंत साधं होतं. कोणत्याही सरकारी कारचा वापर न करता ते नेहमी सरकारी बसने प्रवास करायचे.
त्यांना देण्यात आलेल्या बंगल्यात ते कधीही राहायला गेले नाहीत. ते त्याच्या स्वतःच्या घरात राहत होते. त्यांनी कधी जातीपातीचा भेदभाव केला नाही.
जनेतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ते नेहमीच तत्पर असायचे.
यादव यांच्या या साधेपणामुळे ते जनतेमध्ये खूप प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांना 'शेर-ए-दिल्ली' आणि 'मुघल-ए-आझम' अशी उपाधी देण्यात आली होती.