Raigad Fort : गुजरातमध्ये 'शिवरायांचा दुर्ग रायगड'; मोदींचं मराठीतून ट्विट अन्...

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रीय एकता दिन

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी केली जाते. दरवर्षी या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले जाते.

Raigad Fort | sarkarnama

कार्यक्रमाचे आयोजन

गुजरातमधील केवाडियातील एकतानगर येथे गुरूवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेल्या रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती.

Raigad Fort | sarkarnama

रायगड किल्ल्याची प्रतिकृती

दरवर्षी येथे वेगवेगळ्या थीम साकारल्या जातात. यावर्षी रायगड किल्लाची महती सांगत प्रतिकृती साकारण्यात आली.

Raigad Fort | sarkarnama

मोदींची मराठीतून पोस्ट

कार्यक्रमानंतर मोदीजींनी सोशल मीडियावर मराठीतून पोस्ट करत म्हटले की, , रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे.

Raigad Fort | sarkarnama

रायगडाला मानाचे स्थान

धैर्य आणि निर्भयतेची महती मोठी असून या राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमामध्ये रायगडाला मानाचे स्थान देण्यात आले, ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे मोदी म्हणाले.

Narendr Modi. | sarkarnama

शौर्याची गाथा

महाराष्ट्रातील रायगड किल्ला हा इतिहासातील शौर्याची गाथा व्यक्त करतो. शिवाजी महाराजांनी रायगडवरुनच आपला उद्देश साध्य केला होता. याच रायगडाची प्रतिमा आपल्यासाठी प्रेरणा आहे, असं नरेंद्र मोदी भाषणातून म्हणाले आहे.

Raigad Fort | sarkarnama

सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा

छत्रपती शिवाजी महाराजांचा १६७४ साली रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा म्हणून रायगडाची ओळख आहे.

Raigad Fort | sarkarnama

Next : वंचित आघाडीची ट्रान्सजेन्डर 'ग्रेस' फुल उमेदवार ; श्याम ते शमिभा..., रावेर मतदारसंघाच्या रिंगणात

येथे क्लिक करा...