Jagdish Patil
खासदार प्रियंका गांधींचा मुलगा रेहान वाड्रा याच्या दिल्लीतील फोटो प्रदर्शनावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
रेहानने बिकानेर हाऊसच्या व्यवस्थापनाने ‘No Idea Is Final’ या प्रदर्शनात दिल्लीतील आंदोलकांचे फोटो प्रदर्शित करण्यावर आक्षेप घेतल्याचा आरोप केला.
व्यवस्थापनाने तिरंग्याची दोन फोटो हटवण्यास सांगितली, मात्र आपण ही छायाचित्रे हटवण्यास नकार दिल्याचा दावाही त्याने केला.
त्यानंतर आंदोलनांशी संबंधित फोटोंचा संपूर्ण संग्रह प्रदर्शित करण्यासाठी दुसरी जागा शोधण्याचा निर्णय घेण्यात आला.
रेहान वाड्रा हा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा आहे.
रेहानने राजकारणाऐवजी फोटोग्राफी आणि व्हिज्युअल आर्टच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याचा मार्ग निवडला आहे.
त्याला लहानपणापासूनच फोटोग्राफीची आवड आहे. वन्यजीव आणि जंगलांची छायाचित्रे काढण्यापासून त्याची फोटोग्राफीमधील आवड वाढत गेली.
रेहानचे प्राथमिक शिक्षण दिल्लीत झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो डेहराडूनला गेला.
2019 मध्ये रेहानने लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (SOAS) मध्ये प्रवेश घेतला.
येथे त्याने राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच त्याने फोटोग्राफीशी संबंधित असाइनमेंटही पूर्ण केले.
रेहानने डिसेंबर 2025 च्या अखेरीस आपली प्रेयसी अवीवा बेग हिच्याशी साखरपुडा केला होता.