WhatsApp वरचं ई-तिकीट दाखवलं तर 'विदाऊट तिकीट' समजून दंड, रेल्वेचा नवा नियम काय?

Ganesh Sonawane

WhatsApp तिकीट आता ग्राह्य नाही!

व्हॉट्सॲपवर आलेले रेल्वे ई-तिकीट किंवा त्याचा स्क्रीनशॉट दाखवून प्रवास करता येणार नाही.

Railway WhatsApp ticket rules | Sarkarnama

मूळ डिजिटल तिकीट

ई-तिकीट बुक केलेल्या मोबाईलमध्येच मूळ डिजिटल तिकीट दाखवणे आवश्यक आहे.

Railway WhatsApp ticket rules | Sarkarnama

‘Rail One’ वापरणाऱ्यांनी सावध राहा

विशेषतः Rail One ॲपवरून बुक केलेल्या अनारक्षित तिकिटांसाठी हा नियम लागू होणार आहे.

Railway WhatsApp ticket rules | Sarkarnama

तिकीट दाखवता आलं नाही तर दंड!

तपासणीवेळी वैध मूळ तिकीट सादर करता न आल्यास विनातिकीट प्रवास मानला जाऊ शकतो.

Railway WhatsApp ticket rules | Sarkarnama

भाड्यासोबत दंडाचाही फटका

तिकीट वैध असल्याचे सिद्ध करता न आल्यास रेल्वेच्या नियमानुसार भाडे आणि दंड आकारला जाऊ शकतो.

Railway WhatsApp ticket rules | Sarkarnama

ई-तिकिटाचा गैरवापर रोखण्यासाठी निर्णय

डिजिटल तिकिटांची देवाणघेवाण आणि गैरवापर टाळण्यासाठी रेल्वेने तिकीट तपासणीचे नियम कडक केले आहेत.

Railway WhatsApp ticket rules | Sarkarnama

मोबाईल बंद पडला तर अडचण होणार!

प्रवासापूर्वी Rail One ॲपमध्ये मूळ तिकीट आहे का आणि मोबाईल पुरेसा चार्ज आहे का, हे तपासा.

Railway WhatsApp ticket rules | Sarkarnama

तिकीटाची बुकिंग वेळही तपासली जाणार

तिकीट तपासणीवेळी ते नेमके कधी बुक करण्यात आले, याची वेळही तपासली जाणार आहे.

Railway WhatsApp ticket rules | Sarkarnama

यापुढे ही काळजी घ्या..

त्यामुळे यापुढे ई-तिकीट स्वतःच्या मोबाईलवरून बुक करावे. स्क्रीनशॉट किंवा किंवा व्हॉट्सॲपवर आलेल्या प्रतीवर अवलंबून राहू नये.

Railway WhatsApp ticket rules | Sarkarnama

NEXT : शरद कोळींना MPDA नुसार अटक, नेमका हा कायदा आहे काय?

MPDA Act | sarkarnama
येथे क्लिक करा