शरद कोळींना MPDA नुसार अटक, नेमका हा कायदा आहे काय?

Roshan More

MPDA म्हणजे काय?

महाराष्ट्र धोकादायक कृत्ये प्रतिबंधक कायदा (MPDA) चा मुख्य उद्देश समाजकंटक आणि सराईत गुन्हेगारांच्या विघातक कृत्यांवर नियंत्रण मिळवून सार्वजनिक सुव्यवस्था राखणे आहे

MPDA Act | sarkarnama

कायदा कोणावर लागू?

झोपडपट्टी दादा व स्थानिक गुंडहातभट्टीवाले व बेकायदेशीर दारू विक्रेते, ड्रग्ज/अंमली पदार्थांचे तस्कर, वाळू तस्कर आणि भू-माफिया यांच्याविरोधात या कायद्याचा उपयोग केला जातो.

MPDA Act

कायद्यातील मुख्य तरतुदी

या कायद्यानुसार आरोपीला थेट १ वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केले जाऊ शकते. या कायद्यानुसार ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांना अटक करून येरवडा तुरुंगात स्थानबद्ध केले आहे.

MPDA Act | sarkarnama

जामीन मिळणे कठीण

हा प्रतिबंधात्मक कायदा असल्याने यामध्ये सहजासहजी जामीन मंजूर होत नाही. पोलीस आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून थेट ही कारवाई केली जाते.

MPDA Act

तडीपारी आणि MPDA मधील फरक

तडीपारीमध्ये गुन्हेगाराला विशिष्ट जिल्ह्यातून किंवा परिसरातून काही काळासाठी बाहेर काढले जाते.तर, MPDA कारवाईत आरोपीला शहराबाहेर न पाठवता थेट मध्यवर्ती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले जाते.

MPDA Act

आरोपीकडे काय पर्याय?

कारवाई झाल्यानंतर आरोपी उच्च न्यायालयात किंवा गृह विभागाच्या सल्लागार मंडळाकडे दाद मागू शकतो.सल्लागार मंडळाच्या मंजुरीनंतरच १ वर्षाच्या स्थानबद्धतेची मुदत कायम राहते.

MPDA Act

कायद्याची गरज काय?

गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन एमपीडीएचा बडगा वापरते.

MPDA Act

NEXT : ISRO सह 16 सरकारी नोकऱ्या सोडत पहिल्याच प्रयत्नात IPS होणाऱ्या तृप्ती भट्ट नेमक्या कोण? जाणून घ्या प्रेरणादायी प्रवास

IPS Tripti Bhatt
येथे क्लिक करा