Railway Jobs : मोठी बातमी! परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी, 550 जागांसाठी सुवर्णसंधी, असा करा अर्ज?

Rashmi Mane

रेल्वे नोकरीचं स्वप्न साकार होणार!

रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न अनेक तरुण पाहत असतात. सुरक्षित नोकरी, चांगला पगार आणि उज्वल भविष्य यामुळे रेल्वे भरतीकडे तरुणांचा ओढा असतो. आता अशाच तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Railway Recruitment 2025 | Sarkarnama

रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये भरती

रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या रेल्वे कोच फॅक्टरी (RCF) मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

Railway Recruitment 2025

परीक्षेशिवाय निवड – मोठी संधी

आजच्या स्पर्धात्मक काळात परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळणं ही मोठी संधी आहे. या भरतीत उमेदवारांची निवड थेट शॉर्टलिस्टिंगच्या आधारे होणार असल्याने अनेक तरुणांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

Railway Recruitment 2025

कोणकोणत्या ट्रेडसाठी भरती?

या भरती अंतर्गत फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिस्ट, पेंटर, कारपेंटर अशा विविध ट्रेडसाठी अप्रेंटिस पदे उपलब्ध आहेत. उमेदवारांना त्यांच्या कौशल्यांनुसार काम करण्याची संधी मिळणार आहे.

Railway Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता काय आहे?

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. ही पात्रता पूर्ण करणारे उमेदवारच अर्ज करू शकतात.

Railway Recruitment 2025

वयोमर्यादा आणि सवलत

या भरतीसाठी उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.

Railway Recruitment 2025

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड १०वी आणि आयटीआय गुणांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल तपासणीद्वारे केली जाणार आहे. कोणतीही लेखी किंवा मुलाखत परीक्षा नाही.

Railway Recruitment 2025 | Sarkarnama

अर्ज कसा करायचा?

सर्वप्रथम www.rcf.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तिथे नवीन रजिस्ट्रेशन करून आयडी-पासवर्ड तयार करा. नंतर लॉगिन करून संपूर्ण अर्ज भरा.

Railway Recruitment 2025 | Sarkarnama

Next : अजित पवारांची 'चाय पे चर्चा'; डोळ्यावर काळा गाॅगल, अंगात जॅकेट; फोटो व्हायरल 

येथे क्लिक करा