Akshay Sabale
लाखो मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधून शुक्रवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला.
वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 2.34 वाजताच्या अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलने द्वितीय श्रेणीच्या डब्यातून भांडुपपर्यंत प्रवास केला.
त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना आणि रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या वेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे एका पुरस्कार समारंभासाठी शहरात आले होते.
या वेळी त्यांनी शहरातील एका गणेश मंडळालाही भेट दिली.