Jagdish Patil
मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आणि उत्तर भारतीयांचे नेते अशी ओळख असणारे राज के पुरोहित यांचे निधन झाले आहे.
70 वर्षांचे राज पुरोहित हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री होते.
रविवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे जनतेशी नाळ जोडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
मुंबई महापालिकेत आता भाजपची सत्ता आली आहे. मात्र, या यशामागे कधीकाळी पुरोहित यांनी तिथे केलेलं काम कारणीभूत ठरलं आहे.
ते मुंबादेवी आणि कुलाबा मतदारसंघातून 1990,1195,1999 आणि 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आले होते.
आमदार आणि मंत्री असतानाच त्यांनी मुंबईत पक्ष संघटनेतही महत्त्वाचं काम केलं आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाचा मोठा विस्तार केला. शिवाय मुंबईतील अमराठी मतदारांना भाजपसोबत जोडण्यात त्यांचं मोठं योगदान आहे.
नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 221 मधून राज पुरोहित यांचा मुलगा आकाश विजयी झाला आहे.
त्यामुळे मुलाच्या विजयानंतर दोनच राज पुरोहित यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.