Dinvishesh 14 December : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी; वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1799 - अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन.

1918 - योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म. जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. "सर्वोत्तम योगाचार्य' असे जे. कृष्णमूर्ती त्यांचे वर्णन करीत. हृषीकेशचे स्वामी शिवानंद यांच्याकडून "योगिराज' हा बहुमान 1952 मध्ये मिळाला. धेसर' हा त्यांचा ग्रंथ जगात "योगविद्येचे बायबल' मानला जातो.

1924 - प्रसिद्ध अभिनेते, चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, वितरण या क्षेत्रांत त्यांनी स्वतःची शिखरे निर्माण केली. अवघ्या तेविसाव्या वर्षी "आग' या चित्रपटाद्वारे निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रातील दमदार वाटचाल त्यांनी सुरू केली. भव्य कलात्मक आणि व्यापारी चित्रपटांबरोबर चाकोरीबाहेरील प्रागतिक चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली.

1977 - नामवंत कवी, लेखक, पटकथाकार, गीतरामायण कार, अभिनेते ग. दि. माडगूळकर यांचे निधन. गीतकार, पटकथा - संवाद लेखक, अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठी आणि पटकथा संवाद लेखक म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांच्या गीतरामायणाने कीर्तीचा कळस गाठला.

1984 - संपूर्ण जुळणी भारतातच झालेल्या पहिल्या मिग-27 विमानाचे यशस्वी उड्डाण.

1986 - प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन. त्यांचे निशान्त, मंथन, भूमिका, जैत रे जैत, मिर्च मसाला, गमन, चक्र, उंबरठा इ. चित्रपट लोकप्रिय झाले.

1999 - पाच वर्षांची मुदत संपण्याच्या सतरा महिने आधीच हरियाना विधानसभा विसर्जित.

1999 - अमेरिकेकडून पनामा कालव्याचे पनामाला हस्तांतर. यामुळे पनामा आणि अमेरिका यांच्यातील शंभर वर्षांचे संबंध संपुष्टात आले.

2003 - इराकचे एक काळचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेन यांना अमेरिकेच्या लष्कराने छापा घालून पकडले.

Next : गोव्याचे 10 वे मुख्यमंत्र्यांचा जन्म आणि बरचं काही; वाचा आजचे दिनविशेष 

Dinvishesh | Sarkarnama
येथे क्लिक करा