Mayur Ratnaparkhe
कल्याण-डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून आता लोकसभेसाठी त्यांचं नाव समोर आलं आहे.
मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांचं नाव दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी पुढे आलं आहे.
मनसे नेते नितीन सरदेसाई यांचं नाव दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहे.
मनसेचे युवा नेते संदीप देशपांडे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अभिजीत पानसे यांचं नाव समोर आलं आहे.
मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश भोसले यांचेही नाव ठाणे लोकसभेसाठी चर्चेत आहे.
मनसेचे वरिष्ठ नेते आणि राज ठाकरेंचे जवळचे समजले जाणारे अविनाश अभ्यंकर यांचे नाव उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहे.
मनसेचे आक्रमक महिला नेत्या शालिनी ठाकरे यांचे नाव उत्तर पश्चिम मुंबईसाठी चर्चेत आले आहे.
मनसेचे पुणे शहाराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे नाव पुणे लोकसभेसाठी चर्चेत आहे.
मनसेचे पुणे शहाराचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचेही नाव पुणे लोकसभेसाठी चर्चेत आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी प्रकाश महाजन यांचं नाव समोर आलं आहे.