Mayur Ratnaparkhe
'हा महाराष्ट्र एकजूट राहू नये. मराठी माणूस एकत्र राहू नये, यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत.'
'जे-जे महाराष्ट्राचे चांगले आहे, ते बाहेर काढा निघत नसेल तर उद्ध्वस्त करा, असे काम सुरू .'
'जगात जेवढीही युद्धे झाली ती जमिनीसाठी झाली. हा इतिहास आहे.'
'आपल्याकडचे नेते लाचार झाले आहेत. मिंधे झाले आहेत., पैशाने वेडे झाले आहेत. '
'मराठी माणसांना उद्योग-व्यवसाय जमत नाही... हा गैरसमज. जगप्रसिद्ध ब्रँड शनेल पर्फ्युमचा अर्क एक मराठी माणूस पुरवतो.'
'आज आपण आपल्यातच भांडतोय. मराठा, कुणबी, माळी, साळी, आगरी, ब्राह्मण हे काय चाललंय? '
'ज्या निष्ठुरपणे देशातील राजकारण सुरु आहे, ज्याप्रकारे न्यायव्यवस्था सुरु आहे. त्यानुसार उद्या ते मुंबईला हात घालायला मागे-पुढे बघणार नाहीत.'
'मरहट्ट्यांचा प्रदेश जसं दिल्लीचं तख्त राखू शकतो तसं ते उलथवून पण टाकू शकतो ह्याची भीती दिल्लीश्वरांना सतावत असते.'
'आपल्याकडे येणारे प्रकल्प हिसकावले जातात, हजारो एकर जमिनी हडपल्या जात आहेत.'
'मराठीबांधवांना माझी हात जोडून विनंती आहे. जे काही आपल्या आजूबाजूला सुरू आहे, ते पाहून सतर्क राहा.'