सरकारनामा ब्युरो
28 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याचे 29 वे आणि शिवसेनेकडून तिसरे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली होती.
शिवतीर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळ्याला राज्यासह देशभरातील अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती.
उद्धव ठाकरेंचे चुलत बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय देखील या सोहळ्याला उपस्थित होते.
या शपथविधीनंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांची भेट घेतली.
त्यावेळी, कुंदा ठाकरे यांना अश्रू अनावर झाले होते. उद्धव ठाकरेही यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
राज ठाकरे यांच्या आई कुंदा ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आई माँसाहेब मीनाताई ठाकरे या दोघीही बहिणी आहेत.
त्यामुळे कुंदा ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काकू-पुतण्या आणि मावशी-भाचा असं दुहेरी नातं आहे.
नाशिकच्या लेकीची कमाल... जिंकली जगातील सर्वात अवघड स्पर्धा, दुसऱ्यांदा झाली आयर्नमॅन