Ganesh Sonawane
अभिनेत्री संयमी खेर हिने पुन्हा इतिहास रचला आहे. तीने दुसऱ्यांदा आयर्नमॅन 70.3 यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
आयर्नमॅन 70.3 ही जगातील सर्वात कठीण व आव्हानात्मक स्पर्धांपैकी एक आहे. स्वीडनमध्ये झालेल्या या रेसमध्ये संयमीने गतवर्षापेक्षाही 32 मिनिटे कमी वेळेची नोंद केली आहे.
स्वीडनच्या थंड पाण्याचा आणि वाऱ्याचा सामना करत स्पर्धेत तिने 20 किमी सायकल चालवणे, 1.9 किमी पोहणे आणि त्यानंतर सलग 21 किमी धावण्याचे लक्ष्य यशस्वी पूर्ण केले.
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तीने भूमिका केल्या आहेत. आयर्नमॅनच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून चित्रपटांच्या शूटिंगमधूनही तीने ब्रेक घेतला होता.
संयमीने 2016 मध्ये मिर्झिया या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
त्यानंतर तिने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत घुमर या चित्रपटाद्वारे एका अपंग फिरकीपटूची भूमिका निभावली होती. त्यावेळी अॅथलिट असण्याचा तिला फायदा झाला होता.
संयमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या स्पर्धेचे फोटो पोस्ट केले आहे. ही स्पर्धा स्वतः विरुद्धचीच असून, कामगिरी उंचावणे हेच ध्येय होते असं तीने म्हटलं आहे.
विशेष म्हणजे संयमीने मासिक पाळी आलेली असतानाही स्पर्धेत भाग घेतला व ती पूर्ण केली.
संयमीने पहिल्यांदा सप्टेंबर 2024 मध्ये आयर्नमॅन 70.3 स्पर्धा पूर्ण केली. त्यानंतर (6 जुलै 2025) रोजी स्वीडनमधील जोंकोपिंग येथे दुसऱ्यांदा आव्हान पूर्ण केले.