Deepak Kulkarni
विधानसभेतील अपयशानंतर मनसेच्या राज ठाकरेंनी आता नव्या आत्मविश्वासानं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुन्हा सुरुवात केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वाढत्या जवळीकतेमुळे बीएमसीच्या निवडणुकीसाठी नवी समीकरणंही जुळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पण याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या गाठीभेटी वाढल्या असून 15 दिवसांतच ही त्यांची तिसऱ्यांदा भेट आहे.
उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी निवासस्थानी गणपतीसाठी उपस्थित राहिल्यानंतर त्याचदिवशी मुख्यमंत्री फडणवीसांनीही शिवतीर्थ गाठलं होतं.
ठाकरे बंधूंनी एकत्र लढवलेल्या बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी राज हे मुख्यमंत्र्यांना भेटले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेऊन बाहेर पडले.
राज ठाकरे तब्बल 35 मिनिटांपेक्षा अधिक काळ वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.
आता राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याचेही समोर आले होते.