Roshan More
गेल्या काही वर्षांत मनसे बॅकफूटवर गेल्याची चर्चा होती. पण आता राज ठाकरे यांनी पुन्हा मनसैनिकांमध्ये हुंकार भरण्यासाठी कंबर कसली आहे. आता त्यांच्यासोबत अमित आणि शर्मिला ठाकरे हेही सक्रिय झाले आहेत.
राज यांची बहीण ही शर्मिला ठाकरे यांची मैत्रीण होती. त्यामुळे राज यांचा लग्नाच्या आधीपासूनच शर्मिला ठाकरे यांना परिचय होता.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरे यांनी पुणे, नाशिक यासह विविध ठिकाणी भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.
नुकतेच त्यांनी धारावी पुनर्रविकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंना सुनावले.
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहेत. मात्र, शर्मिला यांनी आदित्य असे करू शकत नाही, असे म्हणत आदित्य यांची पाठराखण केली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामसाठी अमित ठाकरे यांनी जागर यात्रा काढली होती. या यात्रेत शर्मिला ठाकरे या देखील सामील झाल्या होत्या.
नागपंचमीनिमित्त शर्मिला ठाकरेंची पुण्यात हजेरी लावली होती. त्यांनी महिलांसोबत फुगडी अन् मेहंदी काढत महाराष्ट्राची परंपरा जपली.
शर्मिला ठाकरे यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर भागात पूर आल्यानंतर या भागाचा दौरा केला होता.
शर्मिला ठाकरे या राजकारणासोबत सामाजिक कार्यात देखील सक्रिय आहेत.