Chaitanya Machale
छत्रपती शिवाजीमहाराज यांचे वंशज असलेले संभाजीराजे छत्रपती यांनी आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.
माजी राज्यसभा खासदार अशी त्यांची ओळख असून कोल्हापूर येथे बोलताना त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे हे संकेत दिले.
स्वराज्य संघटनेची स्थापना
संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आहे. ही एक सामाजिक संघटना असून तिची स्थापना 12 मे 2022 केली.
स्वराज्य संघटना प्रामुख्याने शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीवर काम करते. ही संघटना राजकीय पक्ष म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
भाजपच्या शिफारशीवरुन त्यांची 2016 मध्ये राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त म्हणून वर्णी लागली होती.
लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही किती जागा लढविणार याबाबत अजून स्पष्टता नाही. मात्र, 2009 मध्ये झालेल्या जुन्या जखमा आम्ही अजूनही विसरलो नाही.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची भेट घेऊन संभाजीराजे छत्रपती यांनी आपला पाठींबा जाहीर केला होता.
लोकसभेची निवडणूक कोल्हापूर, संभाजीनगर की नाशिक यापैकी नक्की कुठून लढवायची हा निर्णय सुद्धा वेळच ठरवेल, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. त्यावेळी त्याच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यासुद्धा उपोषणात सहभागी झाल्या होत्या.
चर्चेसाठी सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत. जे कोणी जास्त प्रेम देतील तिथे संभाजीराजे उभे राहणार