Vijaykumar Dudhale
बाळा नांदगावकर यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली. नांदगावकर यांची ओळख ही कट्टर शिवसैनिक अशी होती.
बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेत असताना माझगाव विधानसभा मतदारसंघातून 1995, 1999 आणि 2004 असे सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
माझगाव विधानसभा मतदारसंघातून 1995 मध्ये बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले छगन भुजबळ यांचा पराभव केला होता
युती सरकारचे मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात बाळा नांदगावकर यांच्याकडे गृहराज्यमंत्रिपदाचा पदभार देण्यात आलेला होता.
मनसेकडून बाळा नांदगावकर यांनी 2009 मध्ये मुंबईतील शिवडी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांनी शिवसेनेचे दगडू सपकाळ यांचा पराभव केला होता.
शिवसेनेचे अजय चौधरी यांनी 2014 च्या निवडणुकीत बाळा नांदगावकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 ची निवडणूक नांदगावकर यांनी लढवली नव्हती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर बाळा नांदगावकर यांनीही राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. नांदगावकर यांनी मनसेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोलापूरमधून बाळा नांदगावकर यांना मुंबईतील शिवडी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.