Vijaykumar Dudhale
अतिरिक्त तहसील कार्यालयाचा निर्णय बोगस कागदपत्रे तयार करून झाला आहे. दुय्यम निबंध कार्यालयाच्या वेळी गोंधळ झाला; म्हणून या आदेशापर्यंतच्या सर्व शासकीय प्रक्रियेची अत्यंत गोपनीयता पाळली. विरोधकांमध्ये ऐकी नसल्याचा हा परिणाम आहे. गावागावांतून ठराव करा. जो सरपंच, ग्रामसेवक ठराव देत नाहीत, त्याच्या विरोधात समितीकडे तक्रार करा : उमेश पाटील (राज्य प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
अतिरिक्त तहसील कार्यालय अनगरला नेण्यासाठी आजी-माजी आमदारांनी ताकद पणाला लावली आहे. आता कसोटी उमेश पाटील, मानाजी माने व विजयराज डोंगरे या नेत्यांची आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी आंदोलन तीव्र करावे लागेल; अन्यथा आमदार बदलावा लागेल : रमेश बारसकर (माजी नगराध्यक्ष, मोहोळ नगर परिषद)
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता हा निर्णय घेतलेला आहे. त्या विरोधातील लढा हा अधिक तीव्र करण्यात येईल : विजयराज डोंगरे (माजी सभापती, सोलापूर जिल्हा परिषद)
येत्या 15 ऑगस्टच्या एक दिवस अगोदर महिलांसाठी ग्रामसभा असते, त्यात हे कार्यालय सुरू होऊ नये, असा ठराव करावा : सीमा पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अनगरकरांनी विरोधकांत दुफळी निर्माण करून राजकारण केले आहे. गावागावांत सर्वपक्षीय समिती स्थापन करा आणि ग्रामसभेत अतिरिक्त तहसील कार्यालय रद्द करण्याचा ठराव करा : संजय क्षीरसागर (राष्ट्रवादी शरद पवार गट)
अनगरला अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर करण्यासाठी सहकार्य करणारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच मोहोळवर हे संकट आणले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना सर्व वस्तुस्थिती सांगितल्यावर हा निर्णय नक्की रद्द होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या कार्यालयासाठी गावात कोणी विरोध केला तर त्याला फोडून काढू : चरणराज चवरे (जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट)
मोहोळ तालुक्याचे नाव पुसण्याचा विडा या दोघा आजी-माजी आमदारांनी उचलला आहे. तीनच मंडले या अतिरिक्त तहसील कार्यालयामध्ये कशी समाविष्ट केली. हा राजकीय डाव हाणून पाडू : मानाजी माने (माजी उपसभापती, मोहोळ पंचायत समिती)
मोहोळच्या सहकार्यासाठी सर्वांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र यावे. अतिरिक्त तहसील कार्यालयाच्या विरोधासाठी पंधरा सदस्यीय समिती स्थापन करू : (दीपक गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य)