Congress Leader Rajani Patil : काँग्रेसकडून लोकसभेसाठी मोठी जबाबदारी सोपवलेल्या रजनी पाटील....

Deepak Kulkarni

मोठी जबाबदारी....

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या खासदार रजनी पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे.

MP Rajani Patil | Sarkarnama

उमेदवार चाचपणी समितीच्या अध्यक्षा

सात राज्यांत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणीसाठी काँग्रेसच्या समितीच्या त्या अध्यक्षा असतील. पक्षाचे सरचिटणीस सी. वेणूगोपाल यांनी याबाबत पत्र प्रसिद्ध केले आहे.

MP Rajani Patil | Sarkarnama

'एनएसयूआय'मधून सुरुवात

रजनी पाटील यांनी एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून आपल्या राजकीय कार्यास प्रारंभ केला.

MP Rajani Patil | Sarkarnama

किचन कॅबिनेटमधील एक नेत्या

सोनिया गांधींच्या किचन कॅबिनेटमधील एक नेत्या अशी त्यांची ओळख आहे.

MP Rajani Patil | Sarkarnama

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मानस कन्या

रजनी पाटील या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मानस कन्या आहेत

MP Rajani Patil | Sarkarnama

लग्नानंतर त्या मराठवाड्यात स्थायिक

त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातल्या आहेत. लग्नानंतर त्या मराठवाड्यात स्थायिक झाल्या.

MP Rajani Patil | Sarkarnama

भाजपकडून खासदार...

त्या मूळच्या काँग्रेसमधल्या. त्यांनी यापूर्वी बीडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. 1996 मध्ये त्या लोकसभेवर निवडून गेल्या होता. भाजपकडून त्या निवडून गेल्या होत्या.

MP Rajani Patil | Sarkarnama

1998 मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

यानंतर 1998 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता...

MP Rajani Patil | Sarkarnama

उत्कृष्ट संसदपटू ओळख...

दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पक्षाने त्यांना राज्यसभेची संधी दिली. त्यांनी उत्कृष्ट संसदपटू अशी आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

MP Rajani Patil | Sarkarnama

NEXT: अंबादास दानवेंच्या मुलाचा शाही विवाह सोहळा, 'या' नेत्यांची हजेरी

येथे क्लिक करा...