IAS Arti Dogra : उंचीवर जाऊ नका! सरकारमध्ये भलतंच वजन, कोण आहेत आरती डोगरा?

Rajanand More

उंची लहान कीर्ती महान

आरती डोगरा यांची उंची केवळ फक्त 3 फूट 6 इंच असली तरी त्यांचा सरकार दरबारी दबदबा आहे. एक कर्तबगार आयएएस अधिकारी म्हणून राजस्थानमध्ये ओळख.

IAS Arti Dogra | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या सचिव

तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विशेष सचिव होत्या. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहसचिव, अजमेर, बीकानेर, बूंदीच्या जिल्हाधिकारी, जोधपूर विद्युत वितरण महामंडळाच्या महासंचालक यांसह इतर महत्वाच्या पदांवर काम केले आहे.

IAS Arti Dogra | Sarkarnama

देशातील पहिला जिल्हा

बीकानेरच्या जिल्हाधिकारी असताना २०१३ मध्ये त्यांनी उघड्यावर शौचास न जाण्यासाठी मोहिम राबविली. पक्क्या शौचालयांची मोबाईलद्वारे ट्रॅकिंग करणारा देशातील पहिला जिल्हा बनला.

IAS Arti Dogra | Sarkarnama

परदेशातही कामाचे कौतूक

परदेशांतील प्रतिनिधींनीही बीकानेरमध्ये येऊन प्रशंसा केली. मिशन अगेन्स्ट अनिमिया आणि डॉक्टर्स फॉर डॉटर्स या मोहिमांचेही राष्ट्रीय स्तरावर कौतूक.

IAS Arti Dogra | Sarkarnama

मुळच्या उत्तराखंडच्या

आरती डोगरा या मुळच्या उत्तराखंड येथील. त्यांचा जन्म देहराडून येथे झाला. वडील सैन्यात अधिकारी. आई शिक्षिका. जन्मावेळीच डॉक्टरांनी सांगितले होते, मुलगी सामान्य शाळेत शिकू शकणार नाही.

IAS Arti Dogra | Sarkarnama

आई-वडिलांनी दिली प्रेरणा

मुलीला स्वावलंबी बनवण्यासाठी आई-वडिलांनी आरती यांना सतत पाठिंबा दिला. शिक्षणासह खेळांमध्येही प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

IAS Arti Dogra | Sarkarnama

उच्चशिक्षित

देहराडूनच्या वेलहॅम गर्ल्स स्कूलमध्ये शालेय शिक्षण. दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 2006 मध्ये बनल्या आयएएस.

IAS Arti Dogra | Sarkarnama

नवीन सरकारमध्ये मोठी जबाबदारी

राजस्थानातील भजनलाल शर्मा सरकारकडूनही महत्वाच्या पदावर नियुक्ती. माहिती व प्रसारण विभागाच्या सचिव पदावर बदली.

IAS Arti Dogra | Sarkarnama

अनेक मानसन्मान

अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. जोधपूर डिस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्त होणारी पहिली महिला आयएएस अधिकारी. 

IAS Arti Dogra | Sarkarnama

NEXT : प्लेसमेंट नाकारुन युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट झाल्या IAS !

येथे क्लिक करा