सरकारनामा ब्यूरो
राजस्थानचे आयएएस अधिकारी निशांत जैन यांनी लिहिलेले एक पत्र सोशल मिडीयात व्हायरल होत आहे. काय आहे या पत्रात जाणून घेऊयात...
निशांत जैन हे 2014 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सुहानी असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. बुधवारी (ता. 20) त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस होता.
IAS निशांत यांनी सोशल मीडियत पोस्ट केलेल्या पत्रामुळे खूप चर्चेत आले आहेत. त्यांनी त्यांच्या लग्नाच्या सातव्या वाढदिवसाननिमित्त पत्नी सुहानी यांना पत्र लिहिले आहे.
त्यांनी या पत्रात पत्नी सुहानी यांचे आभार मानले आहेत. सात वर्षे दिलेली साथ आणि पुढील आयुष्यातही अशी सोबत राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
पत्रात ते म्हणतात, तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हा वाटले की माझा शोध संपला आहे. पहिल्याच भेटीत तू मला विचारलंस, 'तुला कशी मुलगी आवडेल?' त्या प्रश्नाचे उत्तर या दोन ओळींमध्ये सापडते. हो, मी विचार करत होतो, तशीच तू आहेस.
निशांत यांनी त्यांचे महाविद्यायीन शिक्षण हिंदी माध्यमातून पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी टपाल खात्यात लिपिक पदावर नोकरी केली.
नोकरी सोडून देत त्यांनी 2013 पासून UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. आणि 2014ला परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी संपूर्ण भारतातून 14 वा रँक मिळवला.
निशांत यांच्या रँकनुसार त्यांचे पहिले पोस्टिंग राजस्थानला करण्यात आले. सध्या ते पर्यटन विभागाचे संचालक आहेत.