सरकारनामा ब्यूरो
राजस्थानचे मुख्यमंत्री झालेले भाजप नेते भजनलाल शर्मा यांचा आज वाढदिवस आहे.
योगायोगाने वाढदिवस आणि शपथग्रहण दिन, दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्यामुळे भजनलाल यांच्यासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत असलेल्या वसुंधरा राजे यांना मागे टाकत राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावर भजनलाल यांनी आपले नाव कोरले आहे.
महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रीय काम केले आहे.
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत.
सांगानेर मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवत थेट राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत जाण्याने सर्वांनाच काहीसा धक्का बसला आहे.
भजनलाल शर्मा हे मूळचे राजस्थानमधील भरतपूर येथील आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भजनलाल शर्मा यांचा शपथविधी सोहळा उत्साहात झाला.
यावेळी दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.