Aslam Shanedivan
रोहिणी गुर्जर यांनी 15 वर्षांनंतर पुन्हा शिक्षण सुरु केले आणि राजस्थान लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आणि अधिकारी बनल्या.
रोहिणी गुर्जर यांना पतीच्या निधनानंतर घरातील लोकांचे टोमणे एकावे लागले होते. तर परीक्षेच्या 22 दिवस आधी त्यांच्या मोठ्या मुलीचे निधन झाले
तेव्हा लहान मुलीचा चेहरा पाहून धैर्याने त्यांनी अभ्यास पुन्हा सुरू केला आणि आरएएस परीक्षा दिली. त्या सप्टेंबर 2026 मध्ये अधिकारी बनण्यात.
रोहिणी गुर्जर यांनी आरएएस-2024 परीक्षेत एमबीसी विधवा प्रवर्गात राजस्थानमध्ये दुसरा क्रमांक पटकावला.
रोहिणी गुर्जर यांनी 2006 मध्ये बीए पदवी मिळवली आणि त्या घुघरा त्यांच्या गावातील पहिली पदवीधर झाल्या. त्यानंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले.
त्यांचे वडील सैन्यात होते. तर पदवी शिक्षणानंतर, तिने शिक्षण सोडून एका खाजगी शाळेत शिकवायला सुरुवात केली.
वयाच्या 22 व्या वर्षी, 2011 मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर दीड वर्षांनी पहिल्या मुलीचा जन्म झाला. तर फेब्रुवारी 2021 मध्ये पतीचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला.
पतीच्या मृत्यूनंतर पदरात दोन मुली पण मुलगा नसल्यामुळे त्यांना सासरचे टोमणे ऐकावे लागले. 15 वर्षांनंतर शिक्षण पुन्हा सुरु केले आणि 2021 मध्ये पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा दिली.