सरकारनामा ब्यूरो
तरुण आयपीएस अधिकारी ज्येष्ठा मैत्रेयी यांनी आपल्या कामातील चांगल्या प्रदर्शनाने सगळ्यांना प्रभावित केले आहे.
मध्य प्रदेशच्या गुना येथील ज्येष्ठा यांनी आयपीएस होण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि शेवटी आपले स्वप्न पूर्ण केले.
एमपीपीएससीची उत्तीर्ण करून मध्य प्रदेश आणि मुरैना जिल्ह्यात त्यांनी डीएसपी पदावर काम केले.
समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांना आयपीएस व्हायचे होते. यासाठी पालकांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला.
आयपीएस होण्यासाठी डीएसपी पदावर काम करत असतानाच त्यांनी यूपीएससीची तयारी केली.
पहिल्याच प्रयत्नात 156 व्या रँकसह यूपीएससी उत्तीर्ण करत राजस्थान केडरमध्ये त्या रुजू झाल्या.
पहिली पोस्टिंग उदयपूरच्या गिरवा सर्कलमध्ये ASP, दुसरी भिलवाडाच्या एएसपी आणि नंतर जयपूरच्या क्राइम ब्रांचमध्ये त्या डीसीपी झाल्या.
ज्येष्ठा यांची नुकतीच भिवडी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.