Rashmi Mane
तुकाराम हगवणे – मुळशीच्या भुकूम गावचे नामवंत पैलवान. 1980 मध्ये पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात पदार्पण.
तुकाराम हगवणे झेडपीचे सभापती बनले. त्यांच्या वारशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पुत्र राजेंद्र हगवणेंनी केला.
2004 मध्ये मुळशी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा लढवली – पराभव. तालुकाध्यक्षपद व जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही अपयश.
शेती आणि दूध व्यवसायातून सुरुवात. पुढे जमिनी व कंत्राटं यामध्ये रस. व्यवसायाच्या जोडीने वादही वाढत गेले.
राजेंद्र हगवणेंनी वडिलांचं खोटं मृत्यूपत्र बनवून मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्याचा प्रयत्न – पण योजना उधळली.
शशांक आणि सुशील – राजेंद्र हगवणेंची दोन मुलं. दोघांकडे लायसन्स पिस्तुल असल्याची माहिती.
सुशील हगवणे – अजित पवार गटाचा युवक तालुकाध्यक्ष. पण हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाल्यावर त्यांची आणि वडिलांची पक्षातून हकालपट्टी.
गौतमी पाटीलला बैलशर्यतीत नाचवण्याचा आरोप – या घराण्यावर वादाच्या छायेत आणखी एक कलंक.