Ganesh Sonawane
मुंबई पोलिस दलात 27 वर्ष सेवा करत असताना राजेश पाडवी यांनी अनेक कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद केलं.
त्यांना 'शार्प शूटर' अशी खास ओळख मिळाली होती.
मात्र, शासकीय सेवेत कर्तव्य बजावत असताना जन्मभूमीतील नागरिकांची सेवा करण्याची इच्छा त्यांना स्वस्त बसू देत नव्हती.
राजेश पाडवी यांनी त्यासाठी 3 ऑक्टोबर 2019 मध्ये चक्क पोलिस निरीक्षक पदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
2019 मध्ये त्यांना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभेची उमेदवारी मिळाली.
या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
पहिली आमदारकीची टर्म यशस्वी झाल्यानंतर त्यांना पक्षातर्फे पुन्हा 2024 मध्ये विधानसभेचं तिकीट मिळालं. ते पुन्हा निवडून आले व दुसऱ्यांदा आमदार झाले.
पोलिस निरीक्षक ते लोकप्रतिनिधी हा आमदार राजेश पाडवी यांचा धडाकेबाज प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.