Jagdish Patil
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.
सिंह यांचा जन्म 10 जुलै 1951 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील भाभोरा या गावातील एका राजपूत कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राम बदन सिंह तर आईचे गुजराती देवी नाव आहे.
सुरुवातीचे शिक्षण गावातून घेतल्यानंतर त्यांनी गोरखपूर विद्यापीठातून बी.एस्सी. आणि एम.एस्सी.चं भौतिकशास्त्र विषयातून शिक्षण घेतलं.
उच्च शिक्षणनानंतर त्यांनी मिर्झापूरमधील एका महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे लेक्चरर म्हणून काम केलं. 1974 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
त्यानंतर 1977 मध्ये ते यूपी विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. तर 1988 साली विधान परिषदेवर त्यांची नियुक्त करण्यात आली अन् तेव्हापासून त्यांनी आपलं राजकीय वर्चस्व वाढवण्यास सुरूवात केली.
त्यामुळे 1991 साली यूपीमध्ये पहिलं भाजप सरकार सत्तेत आलं. तेव्हा ते शिक्षण मंत्री बनले. 1994 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले.
22 नोव्हेंबर 1999 रोजी त्यांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाची जबाबदारी देण्यात आली. तर 28 ऑक्टोबर 2000 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
24 मे 2003 ला ते कृषी मंत्री बनले. 2009 साली गाझियाबादमधून खासदार म्हणून विजयी झाले. 2005 आणि 2013 या साली ते दोनदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले.
2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून शपथ घेतली. तर 2019 ते आतापर्यंत त्यांच्याकडे संरक्षण खात्याचा कारभार आहे.