Jagdish Patil
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी आमदार निवास कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे.
या मारहाणीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तर सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या आमदार गायकवाडांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे ते जाणून घेऊया.
आमदार संजय गायकवाड हे धर्मवीर आखाडा चालवतात तर बुलढाण्यात त्यांना पैलवान म्हणून ओळखलं जातं.
बुलढाण्यातील जुनेगाव या वस्तीतील गुन्हेगारांच्या टोळीच्या माध्यमातूनच ते आपली दादागिरी चालवतात, असा त्यांच्यावर आरोप केला जातो.
शिवसेनेतून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. मात्र, माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांना पक्षातून काढलं होतं.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अन् भाजपमध्ये सहभागी झाले. तर 2014 ची विधानसभा त्यांनी मनसेकडून लढवली होती. ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला.
पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली आणि 2019, 2024 या दोन्ही निवडणुका त्यांनी जिंकल्या.
यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्याही एका नगरसेवकाला देखील मारहाण केली होती, अशी वादग्रस्त पार्श्वभूमी आमदार गायकवाड यांची राहिली आहे.