Rashmi Mane
'वेळ आली महाराष्ट्राचा सन्मान, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची'; परळ येथे युवती सेनेचा निर्धार मेळावा.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोट बांधली आहे.
युवा सेनेच्या युवती निर्धार मेळाव्याचे आयोजन परळ येथे करण्यात आले होते.
या वेळी संमेलनात रश्मी ठाकरे, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, वरुण सरदेसाई आणि युवा-युवती सेनेच्या कोअर कमिटी सदस्यांसोबत प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या.
पक्षाला बळकट करण्यासाठी काम करणाऱ्या राज्यातील उत्साही तरुण महिला पदाधिकाऱ्यांसह संमेलनात सहभागी झाल्या होत्या.
या वेळी सर्व युवती सेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पुढील लढाईसाठी निर्धाराने लढण्याचा निश्चय केला.
या वेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातून युवती या मेळाव्यासाठी उपस्थित होत्या.