Harshvardhan Jadhav : हर्षवर्धन जाधवांना राजू शेट्टींच्या संघटनेचे बळ!

Vijaykumar Dudhale

पहिल्याच निवडणुकीत अपयश

हर्षवर्धन जाधव हे 2004 मध्ये राजकारणात आले. त्या वर्षी विधानसभेची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली, पण त्यात ते पराभूत झाले.

Harshvardhan Jadhav | Sarkarnama

मनसेच्या तिकिटावर आमदार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर 2009 मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. पाच वर्षांच्या आतच त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली.

Harshvardhan Jadhav | Sarkarnama

शिवसेनेत प्रवेश आणि पुन्हा आमदार

हर्षवर्धन जाधव यांनी त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करून 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा विजय मिळविला.

Harshvardhan Jadhav | Sarkarnama

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये लढवली

औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर) मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

Harshvardhan Jadhav | Sarkarnama

विधानसभेला पराभव

कन्नड विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये पुन्हा त्यांनी निवडणूक लढवली. मात्र, शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी हर्षवर्धन जाधव यांचा पराभव करत विजय मिळविला.

Harshvardhan Jadhav | Sarkarnama

संभाजीनगरमधून पुन्हा रिंगणात

हर्षवर्धन जाधव हे 2024 मध्ये अपक्ष म्हणून संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे.

Harshvardhan Jadhav | Sarkarnama

रावसाहेब दानवेंचे जावई

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांची कन्या संजना यांच्याशी हर्षवर्धन जाधव यांचा विवाह झाला होता.

Harshvardhan Jadhav | Sarkarnama

ईशा झा यांच्याशी दुसऱ्यांदा विवाह

संजना जाधव यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ ईशा झा यांच्याशी विवाह केला.

Harshvardhan Jadhav | Sarkarnama

गायनासह अभिनयात छाप, आता निवडणुकीत नशीब आजमावणारा भोजपुरी स्टार पवन सिंह..!

Bhojpuri Star Pawan Singh | Sarkarnama