Raju Shetti : शिरोळच्या रणात पुन्हा राजू शेट्टींचा शड्डू?

Vijaykumar Dudhale

शिरोळमधून चाचपणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधानसभेची आगामी निवडणूक शिरोळ मतदारसंघातून लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

Raju Shetti | Sarkarnama

शिरोळमधूनच आमदार

शिरोळ मतदारसंघातून 2004 मध्ये राजू शेट्टी विधानसभेची निवडणूक जिंकली होती.

Raju Shetti | Sarkarnama

तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न

राजू शेट्टी यांचा राज्यस्तरावर तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Raju Shetti | Sarkarnama

पुण्यात आंबेडकरांसोबत बैठक

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि माजी खासदार शेट्टी यांची उद्या (ता. 27 ऑगस्ट) पुण्यात तिसऱ्या आघाडी संदर्भात बैठक होणार आहे.

Raju Shetti | Sarkarnama

तिसऱ्या आघाडीसाठी राज्य दौरा

राजू शेट्टी यांनी राज्यभरात दौरा करून छोट्या पक्षांशी चर्चा करत तिसऱ्या आघाडीसंदर्भात चाचपणी केली आहे.

Raju Shetti | Sarkarnama

लोकसभेला दोन वेळा पराभव

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांचा पराभव झाला आहे. शेट्टींचा या लोकसभेला दोन वेळा पराभव झाला आहे. मागील निवडणूक त्यांनी महाविकास आघाडीकडून लढवली होती. त्या वेळी त्यांचा पराभव झाला.

Raju Shetti | Sarkarnama

खासदारकीला दोन वेळा विजय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ते 2009 मध्ये अपक्ष लढले होते, तर 2014 मध्ये राजू शेट्टी यांनी महायुतीकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला होता.

Raju Shetti | Sarkarnama

माने, आवाडे यांचा पराभव

राजू शेट्टी यांनी 2009 मध्ये निवेदिता माने यांचा, तर 2014 मध्ये कल्लापण्णा आवाडे यांचा पराभव केला होता.

Raju Shetti | Sarkarnama

बलात्कारात शिक्षा भोगणाऱ्याला निवडणुकांच्या काळात मिळतो ‘पॅरोल’

Dera Chief Ram Rahim | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा