Pradeep Pendhare
शिक्षा लागल्यापासून आतापर्यंत राम रहीम जवळपास 10 वेळा त्याला तुरुंगातून ‘पॅरोल’मिळाला आहे.
विशेष म्हणजे हरियाणा आणि शेजारच्या राज्यात निवडणुका असताना राम रहीमची तुरुंगातून सुटका होते. आताही हरियाणा निवडणुकीच्या आधी त्याला ‘पॅरोल’ मिळाला आहे.
हरियाणा, पंजाब व उत्तर प्रदेशमप्रमाणेच राजस्थानमध्येही डेरा सच्चाचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत.
याही वर्षी जानेवारी 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीआधी त्याला 50 दिवसांचा 'पॅरोल' मिळाला होता.
राम रहीमला राजकीय वरदहस्त आहे. रनिया विधानसभा मतदारसंघ सिरसा जिल्ह्यात येत असून, याच जिल्ह्यात डेरा सच्चाचे मुख्यालय आहे.
हरियाणाचे कारावास मंत्री आणि सध्या भाजपवासी असलेले रंजीतसिंह चौटाला यांना रनिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे.
हरियाणा राज्यात 2022 मध्ये पंचायत निवडणुका होत्या. त्यावेळी ऑनलाइन सत्संगमध्ये भाजपचे नेते व कर्नालचे माजी महापौर रेणू बाला गुप्ता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.