Sachin Fulpagare
येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपकडून 9 उमेदवारांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी आता दिल्लीला पाठवण्यात आली आहे.
राज्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे.
दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांची नावे आहेत.
पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवण्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत. केंद्रीय कार्यकारिणी लवकरच अंतिम निर्णय घेईल, असे बावनकुळे म्हणाले.
पंकजा मुंडे यांना योग्य पद दिले जाईल. त्या सध्या पक्षाच्या राष्ट्रीय मंत्री आहेत. पंकजांबद्दल जाणीपूर्वक गैरसमज पसरवले जातात. मात्र पक्ष त्यांची योग्य ती दखल घेणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.