ED Action On Maharashtra Politician : 'ईडी'च्या कचाट्यात अडकलेल्या 'या' नेत्यांनी धरली भाजप सरकारची वाट; पाहा यादी!

Chetan Zadpe

आमदार यामिनी जाधव -

आमदार यामिनी जाधव यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करत, भाजप-शिवसेना सरकारला समर्थन दिले.

ED Action On Maharashtra Politician | Sarkarnama

आमदार प्रताप सरनाईक -

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याभोवती ईडीचा फास आवळला होता. मात्र, त्यांनी भाजप-शिवसेना सरकारला पाठिंबा दिला. यानंतर त्यांच्यावरील ईडीची कारवाई सैल झाली.

ED Action On Maharashtra Politician | Sarkarnama

खासदार भावना गवळी -

यवतमाळ वाशीमचे खासदार भावना गवळी यांच्यावर ईडीची कारवाई सुरू होती, पण त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत, भाजपप्रणित एनडीए सरकारला पाठिंबा दिला.

ED Action On Maharashtra Politician | Sarkarnama

माजी खासदार आनंदराव अडसूळ -

शिवसेनेचा खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर भाजपने त्यांच्यावर आरोप करण्याचे थांबवले.

ED Action On Maharashtra Politician | Sarkarnama

उपमुख्यमंत्री अजित पवार -

किरीट सोमय्या यांच्या आरोपांच्या हिटलिस्टवर कायमच अजित पवार राहिले. सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळ्यापासून अनेक आरोप भाजपने त्यांच्यावर केले होते. अखेर पवार हे भाजप - शिवसेना सरकारमध्ये सामील झाले.

ED Action On Maharashtra Politician | Sarkarnama

मंत्री हसन मुश्रीफ -

मंत्री हसन मुश्रीफ कायमच ईडीच्या रडारवर होते. त्यांना अटक होईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर ते राज्यातील भाजपप्रणित सरकारमध्ये मंत्री बनले.

ED Action On Maharashtra Politician | Sarkarnama

मंत्री छगन भुजबळ -

किरीट सोमय्या आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद-विवाद देशभर गाजले. भाजपने त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. महायुती सरकारमध्ये भुजबळ अखेर कॅबिनेट मंत्री बनले.

R

ED Action On Maharashtra Politician | Sarkarnama

NEXT : अबब...मुकेश अंबानींच्या संपत्तीत एका दिवसात तब्बल 22,389 कोटींची वाढ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

क्लिक करा...